स्थानिक

कांदयाची पट्टीची रोख रक्कम जबरी चोरी करून नेलेचा बनाव करणा-या ट्रक चालकास अटक

बारामती पोलिसांची कामगिरी

कांदयाची पट्टीची रोख रक्कम जबरी चोरी करून नेलेचा बनाव करणा-या ट्रक चालकास अटक

बारामती पोलिसांची कामगिरी

बारामती:वार्तापत्र
गिरीम ता.दौड या परीसरातील शेतक-यांनी २१० पिशवी कांदा माल एकत्र करून तो मार्केट यार्ड कोल्हापुर येथे विकण्यासाठी ट्रक न.एम.एच.१३ आर २७२७ मधुन ट्रक ड्रायव्हर नामे शिवाजी बाळासाहेब ठोयरे रागिरीम ता.दौंड जि.पुणे याचे ताब्यात देवुन त्यास मार्केट यार्ड कोल्हापुर येथे माल विक्रीसाठी पाठविले होते.त्याचेसोबत शेतकरी शिवाजी तलवार, गुलाब धुले असे दोघेजण गेले होते.कांदा विकी झालेनंतर दोन्हीही शेतकरी परत गिरीम येथे आले. व कादंयाची पटीची रक्कम ही ड्रायव्हर नामे शिवाजी बाळासाहेब ठोंबरे रा गिरीम ता दौंड जि पुणे यांस आणणेस सांगितले होते. दि १७/१०/२०२० रोजी रात्रौ ०९/४५ या सुमा चालक शिवाजी बाळासाहेब ठोंबरे श गिरीम ता दौड जि.पुणे याने फोन करून संतोष घुले यांना तसेच पोलीसांना फोन करून कळविले की, निरा ते मोरगाव रोडने येत असताना माझे ट्रकला एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने थांबवुन त्यातील चार इसमांनी खाली उतरून ट्रकचे काचेवर दगड मारून गाडी थांबवुन गाडीत येवुन मला मारहाण करून माझे जवळील कांदयाची पढ़ी रोख रक्कम रुपये ३.५९,४८६, रू व मोबाईल जबरदस्तीने घेवुन निरा बाजुकडे गेले आहेत, सदरची माहीती ही पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ मा. श्री अभिनव देशमुख सो, पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण , मा. श्री मिलींद मोहीते, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग बारामती, तसेच पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो, यांनी आदेश देवुन संपुर्ण पुणे जिल्हयात तसेच लोणंद येथे नाकाबंदी नेमुन सदरचे स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता तसेच पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.सोमनाथ लांडे, पो.स.ई कवितके, चालक सहा फौजदार जाधव, पोका खान, पो.का सांळुके व इतर स्टाफ असे तात्काळ घटनास्थळावर गेले. घडले घटनेबाबत ट्रक चालक शिवाजी बाळासाहेब ठोबरे रागिरीम ता.दौंड जि.पुणे याचेकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे हकीकत सांगितले.त्यांनतर परीसरात पोलीस स्टाफ मार्फत,
गावोगावी काळे रंगाचे स्कार्पिओ व त्यातील इसमाबाबत माहीती घेतली. तसेच लोणंद निरा मार्गावरील सीसीटिकी फुटेजची पाहणी करण्यात आली. परंतु सदर वर्णनाची स्कॉर्पिओ गाडी कोठेच दिसुन आली नाही तसेच रक डायवर हा दुपारी कोल्हापुर येथुन निघाल्याचे सांगत होता त्याला पोहचायला खुप वेळ लागल्याने व कोठेही सदर वर्णनाची गाडी दिसत नसल्याने ट्रक चालक हा खोटे बोलत असल्याचा संशय आल्याने त्याचेकडुन कसून चौकशी केलेवर व ट्रकची पाहणी केलेवर त्याचे ट्रकचे केबीनमधील साउंड बॉक्समध्ये कांदयाची पट्टीचे रोख रक्कम रूपये ३.५९,४८६, रू व त्याचावापरता मोबाईल हा मिळुन आला. त्याने स्वतःच सदर पैसे व मोबाईल लपवुन ठेवुन जबरी चोरी करून चोरांनी पैसे चोरल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले त्यानंतर त्याचेकडे चौकशी करता त्याने स्वतःच पैसे व मोबाईल लपवुन ठेवल्याचे व स्वत:च ट्रकची काच फोडुन गवरी चोरी झाल्याच बनाव केल्याचे कबुल केले. त्याबाबत त्याचेवर वनिपो.स्टे गु.र.न ४८३/२०२० भादवि ४०७ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला असुन, त्यास गुन्हयाचे कामी अटक करणेत आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई कवितके हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक, अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते सो, बारामती विभाग धारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नारायण शिरगावकर, बारामती विभाग
बारामती , श्री.पद्माकर घनवट पोलीस निरीधक, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रा. याचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.सोमनाथ लांडे, पो.स.ई श्रीगणेश कवितके, चालक सहा फौजदार जाधव, पो.काँ पो.कों सालुंके, पो.कॉ पिसाळ , होम कुंभार होम गण्ड, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडील पो.स.ई गोरे, पो.हवा अनिल काळे , पो.इवा. रविराज कोकरे, पो.हवा शिरसट व इतर स्टाफ यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram