बारामती प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला
बारामती प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने आज दि.20 रोजी बारामती तहसीलदार कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नुकसान झालेल्या शेतमालाची होळी करून बोंबाबोंब मारून सरकारचा निषेध करण्यात आला,नेत्यांनी दौरे थांबवावुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी व लवकरात लवकर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी ५०,००० रू मदत द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी मागण्या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना देण्यात आले नायब तहसीलदारांनी आपली मागणी शासन दरबारी पोहचवू असे आश्वासन दिले.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माणिकराव दांगडे,आण्णा रूपणवर, जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे, तालुकाध्यक्ष अँड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, काका बुरूंगले,गिरीधर ठोंबरे, शैलेष थोरात, लखण कोळेकर, अविनाश मासाळ,चंद्रकांत वाघमोडे,भिसे,दिलीप धायगुडे,किशोर सातकर,निखील दांगडे, भुषण सातकर, तेजस जमदाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.