स्थानिक

मोरगांव येथील मयुरेश्वराचा शाही दसरा उत्सव रद्द

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे  मयुरेश्वराचा  विजयादशमी सोहळा संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे .

मोरगांव येथील मयुरेश्वराचा शाही दसरा उत्सव रद्द

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे  मयुरेश्वराचा विजयादशमी सोहळा संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे .

बारामती वार्तापत्र

मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला विजयादशमीचा सोहळा रद्द करण्याचे मोरगांव येथील समस्त ग्रामस्थ व मानकऱ्यांनी  ठरवले आहे.  येथील दसऱ्याची  शेकडो  वर्षांची परंपरा आहे .मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे श्रींचा सीमोल्लंघन सोहळा न काढण्याचा निर्णय ग्रामस्थ व मानकऱ्यांनी घेतला असल्याची माहीती सरपंच निलेश केदारी यांनी दिली

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे  मयुरेश्वराचा  विजयादशमी सोहळा संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे . हा सोहळा पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातुन भावीक येतात .  हा उत्सव शेकडो वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .  उत्सवाच्या निमित्ताने संपुर्ण  ग्राम प्रदक्षिणा व ग्रामदैवतांच्या भेटीस हा सोहळा  पालखी , अबदागिरी , छत्री , सनई चौघड्याचा मंगलमई सुर  , शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करीत मार्गक्रमण करीत असतो.

पालखी समोर तोफांची सलामी  दिली जाते . दशमुखी  रावणाचे दहण ,व मोरया मोरयाचा जयघोष करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त बाजार तळावर  एकत्र येतात . ग्रामप्रदक्षणा करीत असताना फिरंगाई माता गोंधळ , हरमळीचा खेळ , महादेव  व गंगेची आरती  , वंशावळ वाचन केले जाते . शिवकालात  वाघु अण्णा वाघ हे  सरदार पानसे यांकडे सेवेला असताना  त्यांकडे  तोफखान्याची जबाबदारी होती . यावेळी  तोफा मयुरेश्वराला अर्पण केल्या  होत्या. पैकी आजही पाच  तोफा अस्तित्वात आहेत .

श्रींच्या पालखी पुढे या तोफा उडवल्या जातात. मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे हा सोहळा  रद्द करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले  आहे . सोहळ्यास परवानकी मिळणेबाबत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करुनही परवानकी न मिळाल्याने  गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी , ग्रामजोशी ,पुजारी यांनी बैठक घेऊन सोहळा रद्द करुन  प्रशासनास मदत करण्याचे ठरवले आहे  .विजयादशमी सोहळा  रद्द झाला असल्याने दसऱ्या दिवशी भक्तांनी न येण्याचे आवाहन   करण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram