नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नाथदेवराई फाउंडेशन ने साजरा केला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा.
'करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई' हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/10/583858d6-252d-4efb-904e-65bbe5d6dd2d-780x470.jpg)
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नाथदेवराई फाउंडेशन ने साजरा केला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा.
‘करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई’ हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत
यवत : बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील माणकोबावाडा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन दि. २२ रोजी नाथदेवराई फाउंडेशन ने वृक्षारोपण व वृक्षदान कार्यक्रम आयोजित केला होता. ‘करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई’ हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व झाडांचे संगोपन करण्याचे काम करत आहेत.
सकाळी ९ वाजता देवीची आरती करून नाथदेवराई फाउंडेशन, जोगेश्वरी ग्रुप, सिद्धनाथ तरूण मंडळ, माणकोबा तालीम संघ, व माणकोबावाडा ग्रामस्थ एकत्र येऊन झाडांची पुजा करून झाडांचे वाटप करण्यात आले . त्यानंतर माणकोबावाडा रस्त्याला देशी वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.
नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य पोपट शिवाजी लकडे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद म्हणुन ५० चिंचेच्या वृक्षांचे वाटप केले. व सर्वांना माझी मुलगी माझा अभिमान हा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी मारुती बाळु बिचकुले, धुळा सटु भिसे, दादा हिरामण बिचकुले, राजु बबन बिचकुले, दादा ठकू भिसे, लहू लक्ष्मण लकडे, भिमाजी बापु लकडे, मल्हारी नाथु बिचकुले, पप्पु बाळू लकडे, भाऊसो भिमाजी खताळ, प्रकाश बापु भिसे, कैलास भिमाजी पिंगळे व बापु बबन लकडे आदी कार्यकर्त्यांनी वृक्षभेट व इतर सहकार्ये केले.
त्याचबरोबर या कार्यक्रमाला नाथदेवराई फाउंडेशन सदस्य, माणकोबा वाडा ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीकांतजी हंडाळ ( दौंड भटकंती) हे उपस्थित होते.