स्थानिक

बारामती पोलीस उपविभागातील कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.

बारामती पोलीस उपविभागातील कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.

बारामती वार्तापत्र
बारामती पोलीस उपविभागात कार्यरत असणारे दादासाहेब संभाजी ओमासे व दिलीप निवृत्ती सोनवणे यांची पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

पदोन्नती झालेले पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब संभाजी ओमासे व दिलीप निवृत्ती सोनवणे यांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांनी अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button