कर्तव्यात हलगर्जीपणा कराल तर थेट कारवाई करणार-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
योग्य पद्धतीने काम करण्याच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना.

कर्तव्यात हलगर्जीपणा कराल तर थेट कारवाई करणार-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
योग्य पद्धतीने काम करण्याच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना.
बारामती वार्तापत्र
आज दि.24 ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर शासकीय विश्रामगृहात प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील शेतीपिकांचे त्याचबरोबर नागरिकांच्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून सध्या राज्य सरकारने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इंदापूर तालुक्यात अधिका-यांकडून समाधानकारक कामकाज पहायला न मिळाल्याने व अधिकारी वर्ग राज्यमंत्र्यांच्या प्रश्नांना निरुत्तर असल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढला.यापुढे कामात कुचराई कराल तर थेट कारवाई करणार अशा शब्दात दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेताना शहरातील परिस्थितीवर भरणे यांनी समाधान व्यक्त केले मात्र ग्रामीण भागातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारणे न देता उर्वरित सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करा अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहीमे अंतर्गत माझ्या कुटुंबापर्यंत अद्याप पर्यंत कोणीही पोहोचलेले नाही. ज्या दिवशी माझ्या कुटुंबाची व माझी तपासणी संबंधित यंत्रणेमार्फत होईल त्या दिवशी मला विश्वास बसेल की कामकाज व्यवस्थित चालू आहे. असे देखील भरणे यांनी अधिकारी वर्गाला सुनावले आहे.
यावेळी उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,मुख्याधिकारी डाँ.प्रदीप ठेंगल,वैद्यकिय अधिकारी डाॅ.सुहास शेळके,इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे दिलीप पवार,भिगवण चे रियाज शेख,तालुका कृषी अधिकारी रुपनवर,महावितरणचे रघुनाथ गोफणे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,नगरसेवक अमर गाडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.