बारामतीमध्ये 24 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4210 वर गेली आहे.
बारामतीमध्ये 24 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4210 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (31/10/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -13 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 51 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+06+11=24. शहर-19 . ग्रामीण- 05. एकूण रूग्णसंख्या-4210 एकूण बरे झालेले रुग्ण- 3940 एकूण मृत्यू– 114.
बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबे नगर येथील 22 वर्षीय महिला, घाडगे वस्ती येथील 25 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 36 वर्षीय पुरुष, अवधूत नगर येथील 35 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथील 38 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत जळोची रोड येथील 32 वर्षे पुरुष, जळोची येथील 74 वर्षीय पुरुष, तावशी येथील 55 वर्षीय पुरुष, बारामती येथील 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, मुक्ती विहार जळोची येथील 30 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित.
पवार लॅब मध्ये झालेल्या रॅट तपासणीत कण्हेरी येथील 45 वर्षीय रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच दुकानदारांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आपले शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.