
बारामती पोलीस दलात खात्यातील बदल्यांचे सत्र सुरू
पहा कुणाची कुठे झाली बदली
बारामती वार्तापत्र
पोलीस खात्यातील नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्याने आणि काही विनंती बदल्याचे आदेश पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा काढले आहेत त्या मध्ये बारामती शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या ही बदल्या झाल्या असून बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या नामदेव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर बारामती शहर पोलीस स्टेशनचे सध्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची सायबर क्राईम ला बदली करण्यात आली आहे.










