राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले
अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले
अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती.
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतंच त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवत याबाबतची माहिती दिली.
रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर आज (2 नोव्हेंबर) अजित पवारांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
त्यानतंर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नुकतंच सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवल आहे. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि डॉक्टरांचे आभार असे लिहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा टेस्ट केली असता तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती.