बारामती नगरपालिकेच्या धोरणांच्या निषेधार्थ बांधकाम व्यवसायिकांनी आंदोलनाचा घेतला पवित्रा; मागण्या मान्य होईपर्यंत बारामतीमधील बांधकामे बंद
नगरपरिषद मध्ये फायली मंजूर होत नसल्याचा परिणाम
बारामती नगरपालिकेच्या धोरणांच्या निषेधार्थ बांधकाम व्यवसायिकांनी आंदोलनाचा घेतला पवित्रा; मागण्या मान्य होईपर्यंत बारामतीमधील बांधकामे बंद
नगरपरिषद मध्ये फायली मंजूर होत नसल्याचा परिणाम
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या धोरणाच्या निषेधार्थ बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी दि.६ रोजी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने काम बंद आंदोलन करत आत्मचिंतन करणार असल्याचे जाहीर केले आहे. क्रेडाईचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे व सचिव राहुल खाटमोडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
केंद्र सरकारने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले, तर राज्य सरकारने मुद्रांक शुल्कदेखील ३ टक्के कमी केले. मात्र त्याचा फायदा बारामतीत घर घेऊ इच्छिणाऱ्यांना होताना दिसत नाही, कारण बारामतीत गेल्या सहा महिन्यात नगरपरीषदेकडे दिलेले बहुतांश बांधकाम प्रस्तावच मंजूरीविना पडून आहेत. नगरपरिषदेच्या या वेटींग भूमिकेने राज्य, केंद्राबरोबर नगपरीषदेसही मिळणारा महसूल बुडत आहे.शहराचा नावलौकिक वाढला असून गुंतवणूकही वाढती राहीली आहे. योग्य पायाभूत सुविधांमुळे शैक्षणिक संकुल, औद्योगिक वसाहतीमुळे हे शहर स्मार्ट शहराकडे वाटचाल करीत आहे, मात्र कोरोनाच्या काळात सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम व्यवसायास नगपरीषदेच्या भूमिकेमुळे आणखी फटका बसत असल्याचे क्रेडाई संघटनेचे म्हणणे आहे.
या संदर्भात नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार रोहित पाटील यांच्याकडे किती प्रकरणे प्रलंबित आहे याची माहिती मागण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेले असता, त्यांनी प्रारंभी माझ्याकडे माहिती लगेच उपलब्ध नाही, आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर लेखी अर्ज करा असे म्हंटले आहे.