पदवीधर व शिक्षक निवडणूक -2020 भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांची आढावा बैठक संपन्न
बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-2020 च्या निवडणूकीबाबत प्राथमिक माहिती दिली.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/11/6798fd08-52bd-464f-9e5a-d4115996fb70.jpg)
पदवीधर व शिक्षक निवडणूक -2020 भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांची आढावा बैठक संपन्न
बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-2020 च्या निवडणूकीबाबत प्राथमिक माहिती दिली.
बारामती वार्तापत्र
पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक – 2020 प्रक्रियेकामी भरारी व स्थिर सर्वेक्षण पथकांची आढावा बैठक आज तहसिल कार्यालय, बारामती येथे निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नायब तहसिलदार व अचार संहिता कक्षाचे प्रमुख महादेव भोसले, भरारी व स्थिर सर्वेक्षण पथकांचे प्रमुख व त्यांचे सहायक उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-2020 च्या निवडणूकीबाबत प्राथमिक माहिती दिली. पथक प्रमुखांनी आणि सहायकांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवू नयेत, वेळोवेळी बैठका तथा कार्यशाळा घेण्यात येतील त्यांसाठी सर्वांनी तत्पर हजर राहणे, नेमूण दिलेली कामे योग्य रीतीने पार पाडणे, रोजच्या रोज रिपोर्टिग करणे, नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी पूर्व कल्पना दिल्याशिवाय गैरहजर राहू नये, अचार संहितेचे योग्य पालन करणे इत्यादी सूचना जाधव यांनी दिल्या.