इंदापूर तहसील कार्यालयात पिठलं भाकरी वाटून भाजपा कार्यकर्त्यांनी नाेंदवला महाविकास आघाडी सरकारचा निषेध
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापि शासनाकडून मदत न मिळाल्याने आंदोलन

इंदापूर तहसील कार्यालयात पिठलं भाकरी वाटून भाजपा कार्यकर्त्यांनी नाेंदवला महाविकास आघाडी सरकारचा निषेध
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापि शासनाकडून मदत न मिळाल्याने आंदोलन
बारामती वार्तापत्र
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी सरसकट आर्थिक मदत देण्यात येईल असे अश्वासन सरकारने दिले हाेते,मात्र आज धनत्रयाेदशीचा दिवस उलगलडा परंतु शेतकऱ्यांना आद्याप मदत मिळाली नसल्याने इंदापूर भारतीय जनता पार्टी कडुन आज दि. 13 राेजी इंदापुर तहसील कार्यालयात पिठलं भाकरी वाटून राज्यसकारचा निषेध नाेंदविण्यात आला
यावेळी इंदापुर तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार , पश्चिम महाराष्ट्र किसान माेर्चाचे प्रमुख माऊली चवरे , शहराध्यक्ष शकिल सय्यद , जेष्ठ नेते मारूती वणवे , बाबासाहेब चवरे , माजी शहराध्यक्ष माऊली वाघमाेडे , राम आसबे , सचिन सावंत , अँड रणजीत पाटिल , माऊली मारकड , संदिप आदलिंग , संताेष कांबळे , अँड आसिफ बागवान , इम्राण जमादार , मिलिंद गायकवाड , प्रेमकुमार जगताप , राहुल वाघमाेडे . यांसह सामाजीक कार्यकर्ते उपस्थीत हाेते.