‘पंच्याहत्तरी ‘त ला तरुण सेवेतून निवृत्त,,तरुणालाही लाजवेल अशी कामगिरी करणारे द.रा.उंडे यांची आज स्वेच्छानिवृत्ती
शरद पवारांनी व्यक्त केली कृतज्ञता
‘पंच्याहत्तरी ‘त ला तरुण सेवेतून निवृत्त,,तरुणालाही लाजवेल अशी कामगिरी करणारे द.रा.उंडे यांची आज स्वेच्छानिवृत्ती
शरद पवारांनी व्यक्त केली कृतज्ञता
बारामती वार्तापत्र
साधारण एखाद्या व्यक्तीचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न किंवा साठ वर्षानंतर येते मात्र बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय राजाराम उंडे उर्फ अण्णा हे आज वयाच्या पंचाहत्तरीत स्वेच्छेने निवृत्त झाले.
विद्या प्रतिष्ठान बारामती या शिक्षण संस्थेची उभारणी 1972 साली संस्थेचे अध्यक्ष मा. शरद चंद्रजी पवार साहेब यांनी बारामतीत केली. बालवाडीपासून ते वेगवेगळ्या विषयाची पदवी, पदव्युत्तर शिक्षण इत्यादीसाठी राज्यात ,देशात प्रसिद्ध असलेले शिक्षणाचे माहेरघर म्हणून बारामतीची ओळख प्रचलित आहे स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या अठ्ठेचाळीस वर्षात उत्तुंग ,यशस्वी आणी तितक्याच निष्ठेने आपले काम करणारे संस्थेचे सचिव संस्था उभारणी पासून आजपर्यंत आपल्या प्रामाणिक पणा व झोकून देऊन काम करणारे सचिव द.रा.उर्फ आन्ना आज स्वच्छेने निवृत्त झाले
पवार साहेबांनी व्यक्त केली कृतज्ञता
संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट लिहून मुंडे यांचा सन्मान केला यामध्ये पवार यांनी लिहिले की 16 ऑक्टोबर 1972 रोजी विद्या प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना बारामती येथे झाली संस्थेच्या स्थापनेपासून सलग 48 वर्षे संस्थेच्या सचिव पदावर श्री उंडे तथा अण्णा कार्यरत आहेत त्यांची कष्ट करण्याची वृत्ती, नीटनेटकेपणा ,निरपेक्षता, प्रामाणिकपणा ,शैक्षणिक कार्याबद्दल ची निष्ठा यामुळे विद्या प्रतिष्ठान प्रशासकीय व शैक्षणिक शिस्त प्राप्त झाली संस्थेचे सचिव या नात्याने जबाबदारी पार पाडताना त्यांच्या संघटन कौशल्याचे प्रत्यंतर बारामती सूतगिरणी, कॉसमॉस बँक, महात्मा गांधी बालक मंदिर बारामती, टेक्स्टाईल पार्क प्रा. लि. या संस्थांच्या संस्थात्मक कार्यातून दिसून आले अण्णा स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत तसेच एक समाजसेवक आहेत संगीतप्रेमी ,कलाप्रेमी, अभिजात साहित्याचे वाचक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे संस्थेला श्री मुंडे यांची उणीव सतत भासत राहील त्यांना दीर्घ व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री द.रा.उंडे यांचा या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड अशोक प्रभूने, ऍड नीलिमा गुजर, तसेच संस्थेच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत अजित दादा पवार यांनी त्यांचा सत्कार केला.