बारामती पोलिसांना जीजाऊ ब्रिगेडची अनोखी भाऊबीज
दिवाळी चा फराळ देवून मोठ्या उत्साहात भाऊबीज संपन्न
बारामती पोलिसांना जीजाऊ ब्रिगेडची अनोखी भाऊबीज
दिवाळी चा फराळ देवून मोठ्या उत्साहात भाऊबीज संपन्न
बारामती वार्तापत्र
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बारामती यांच्या वतीने बारामती शहर पोलिस स्टेशन या ठिकाणी भाऊबीज साजरी करण्यात आली देशाच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहोरात्र सेवा करणारे तसेच कोविड योध्दा म्हणून कर्तव्य बज़णारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी यांनी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन केले होते
बारामती शहर पोलिस निरीक्षक मा.श्री.नामदेवराव शिंदे व सर्व पोलिस कर्मचारी बारामती तालुका आध्यक्ष प्रा.सुक्ष्मा जाधव सल्लागार अँड सुप्रिया बर्गे संघटक कु आरती कुंजीर यांनी भाऊबीज निमीत्ताने सर्व पोलीस बांधवांना औक्षण करून व दिवाळी चा फराळ देवून मोठ्या उत्साहात भाऊबीज संपन्न केली या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती श्री दिपक भराठे पुणे जिल्हा आध्यक्ष मराठा सेवा संघ श्री विकास खोत शहराध्यक्ष मराठा सेवा संघ बारामती नानासाहेब गावडे सचिव एकता शेंद्रिय गट मळद चि प्रितम गुळूमकर इ उपस्थित होते व कार्यक्रमाचे आयोजन श्री दिपक भराटे व श्री विकास खोत यांनी केले होते