कोरोनाचा विळखा आणखी घट्ट… बारामतीत काल एकुण 34 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या122 वर गेली आहे.

कोरोनाचा विळखा आणखी घट्ट… बारामतीत काल एकुण 34 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या122 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (17/11/20) एकूण rt-pcr नमुने 126. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -07 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 288 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+05+25=34. शहर-24 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-4501 एकूण बरे झालेले रुग्ण- 4219 एकूण मृत्यू– 122.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बयाजी नगर येथील 37 वर्षे पुरुष, सांगवी येथील पंधरा वर्षीय मुलगा, अकरा वर्षीय मुलगा, 39 वर्षीय महिला, बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय युवती, मेडद येथील 65 वर्षीय महिला, सोमेश्वर नगर येथील 46 वर्षीय महिला, बारामती शहरातील 67 वर्षीय महिला, जळोची रोड येथील 32 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 41 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 63 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबे नगर येथील चाळीस वर्षीय पुरुष, संचित हॉस्पिटल येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 32 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 34 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत कऱ्हावागज येथील 57 वर्षीय पुरुष व मुजावर वाडा येथील चाळीस वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये उत्कर्ष नगर येथील 71 वर्षीय महिला, रेवंत रेसिडेन्सी येथील आठ वर्षीय मुलगा, कसबा येथील 55 वर्षीय महिला, टीसी कॉलेज रोड येथील 29 वर्षीय पुरुष, देवळे इस्टेट येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये विश्वासनगर गुणवडी रोड येथील 18 वर्षीय युवक, सोनगाव येथील 38 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 26 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 26 वर्षीय महिला, तांदुळवाडी रोड येथील 38 वर्षीय महिला, कल्याणीनगर येथील 42 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 60 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 29 वर्षीय महिला, बयाजी नगर येथील 29 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.