इंदापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट
इंदापूरच्या विकास कामांबद्दल झाली चर्चा
इंदापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट
इंदापूरच्या विकास कामांबद्दल झाली चर्चा
बारामती वार्तापत्र
इंदापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी संगमनेर येथे जाऊन दिवाळी निमित्ताने बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेतली, या भेटी प्रसंगी बोलताना महसूल मंत्री थोरात यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची कमतरता महाविकास आघाडी सरकार भासू देणार नाही असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की दिवाळीच्या निमित्ताने संगमनेर येथे जाऊन राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणार असून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष यांना सोबत घेऊन आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र काम केले जाईल, असे मत थोरात यांनी व्यक्त केले असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितले.