स्थानिक

मोटार सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस

जैनकवाडी येथील संशयिताच्या घरातून दोन दुचाक्या जप्त

मोटार सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस

जैनकवाडी येथील संशयिताच्या घरातून दोन दुचाक्या जप्त

बारामती वार्तापत्र

आज दि १८/११/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाहिजे फरारी आरोपी चा शोध घेणे कामी बारामती तालुका येथे पट्रोलिंग करीत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून मौजे जैनक वाडी ता बारामती येथे जाऊन इसम नामे लखन कांतीलाल सूर्यवंशी वय २८वर्षे रा जैनक वाडी ताबारामती जि पुणे यास ताब्यात घेतले असता तो वापरीत असलेली दु चाकी मोटार सायकल ही चोरीची असल्याचे समजले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक मोटार सायकल चोरून आणल्याचे सांगितले यावरून त्याचे ताब्यातून खलिल मुद्देमाल जप्त केला आहे.

१) २०,०००: किंमतीची एक काळे रंगाची होंडा कंपनीची शाईन मॉडेल ची मोटार सायकल
२) २०,०००: किंमतीची एक काळे लाल पट्टे असलेली हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल
एकूण ४०,००० रु किंमतीचा मुद्देमाल सदरील मिळालेली मोटार सायकल ह्या बारामती तालुका पो स्टे गु र नं ६३०/२०२० भा द वी 379  गु र नं ६६१/२०२० भा द वी 379 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आहेत . सदरच्या पथकाने वरील 2 मोटार सायकल व आरोपी पुढील तपास कामी बारामती तालुका पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय अधिकारी बारामती श्री शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे ,पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर ,पो हवा राजपुरे,पो ना अभिजित एकशिंगे ,पो ना विजय कांचन,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button