कोरोंना विशेष

एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते

एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते

मुंबई ; बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadses) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचं बोललं जात होतं. पण त्यांचे कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह (Negative) आले आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये दाखल झाले आणि उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Eknath Khadses corona report negative discharged from hospital)
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट नेगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं होतं.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी चर्चा होती. पण त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हा आल्याने त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram