शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणाचे काम भाजप सरकारच्या काळात-अँड.राहुल मखरे
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य
शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणाचे काम भाजप सरकारच्या काळात-अँड.राहुल मखरे
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि.२१ रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर येथील स्वामीराज हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव यांनी या शिक्षक पदवीधर निवडणूकीत राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघ या राष्ट्रीय ट्रेड युनियनची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे सांगत बीएमपीचे पुरस्कृत उमेदवार रवींद्र सोलनकर यांची उमेदवारी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक संघटनेकडून दिल्यामुळे सोलनकर हे जिंकण्याच्या शर्यतीत आल्याने पारंपरिक व प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांपुढे आव्हानं निर्माण होऊन पुणे विभाग शिक्षक मतदार संघांची निवडणूक चुरशीची ठरणार असून निकाल शिक्षक संघटनांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे म्हंटल आहे.
तसेच पुढे बोलताना मखरे यांनी देशात शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणाचे काम भाजप सरकारच्या काळात झालेले असून खाजगीकरणामुळे देशातील रेल्वे विकण्याचं काम चालू असून बँका विकल्या गेल्या, एअर इंडिया विकली, बीएसएनएल विकली गेली जेवढ्या राष्ट्रीय कंपन्या आहेत तेवढ्या विकण्यास काढलेल्या आहेत. त्यामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण होणार असून केंद्र सरकार व राज्य सरकारने बनवलेल्या पॉलिसीच्या परिणामामुळे देश आर्थिक महासंकटाकडे,आणीबाणीकडे चाललेला आहे,असे आरोप करत केंद्र सरकार व राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, सरकारी कंपन्याचे खाजगीकरण रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणे,खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे नियमित मासिक वेतन देण्याचा कायदा लागू करणे.भाजपा, काँग्रेसने शिक्षण बंद करण्यासाठी षड्यंत्रपूर्वक बंद केलेल्या डी एड, बी एड महाविद्यालयांना पुनर्जीवित करणे.पीएफच्या रक्कमेची खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक रद्द करून केवळ सरकारी व सार्वजनिक उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याचा कायदा अंमलात आणणे.असे प्रश्न व विषय घेऊन शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी, शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी रवींद्र सोलनकर यांना उमेदवारी दिली असून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान घडवून आणून विजय करण्याची जबाबदारी बहुजन समाजातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी यांची आहे असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान झालेल्या या पत्रकार परिषदेत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे,जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ बारवकर,तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग,सुरज धाईजे, प्रकाश पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.