इंदापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर दि.२५ ,इंदापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दि.२३ नोव्हेंबरच्या रात्री इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात तब्बल सात ठिकाणची दुकाने उचकटून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झाला असून याबाबदची लेखी फिर्याद हनुमंत वामनराव पाटील वय- ३३ वर्षे व्यवसाय – कापड दुकान रा.शहा ता.इंदापुर जि.पुणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी कुटूंबासह राहणेस असुन टेंभुर्णी नाका,निकीता पेट्रोल पंपासमोर,इंदापुर येथे पार्वती गारमेंटस अँण्ड कंपनी नावाचे कापड दुकान असुन दुकानाच्या खालील गाळयात आमचे मालकीचे अतुल कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान आहे. ते माझा भाऊ दिलीप वामनराव पाटील हा चालवितो.तसेच माझे दुकानाचे लाईनला आणखी इतर व्यवसायिकांची दुकाने आहेत. दि.२३ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ०८ वाजणेचे सुमारास माझे पार्वती गारमेंटस अँण्ड कंपनी हे दुकान बंद केले. दुकान बंद करीत असताना दिवसभरात व्यवसायाचे आलेले २०,०००/- रूपये रोख रक्कम मोजुन दुकानाचे गल्यात ठेवली व दुकानाचे शटर लावून घरी निघुन गेलो.दि.२४ रोजी सकाळी मी नेहमीप्रमाणे ९ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आलो असता माझे दुकानाचे शटर उचकटलेले व दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले म्हणुन मी दुकानात जावुन पाहणी केली असता माझे दुकानातील गल्याचे लॉक तुटलेले होते व गल्यात ठेवलेली २०,०००/- रूपये रोख रक्कम दिसुन आली नाही.तसेच दुकानातील कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती. साधारण ५,०००/- रूपये किमतीची कपडे चोरीस गेली असल्याचे दिसुन आले.त्याचप्रमाणे माझे दुकानाचे खाली असणारे आमचे मालकीचे अतुल कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटलेले व लॉक तुटलेले दिसले म्हणुन त्यामध्ये पाहणी केली असता त्या दुकानातील १९०००/- रूपये किमतीचे कृषी औषधाचे पाच बाँक्स कोणीतरी अज्ञात चोरटयाने रात्रीचे वेळी चोरी करून नेले असल्याचे दिसुन आले.
याचसोबत याच लाईनला असणारे अतुल गौतम झगडे रा.झगडेवाडी ता.इंदापुर यांचे महालक्ष्मी बझार नावाचे किराणा दुकानाचे देखील शटर उचकटून दुकानातील २९,७३०/- रूपये रोख रक्कम १,८१०/- रूपये किमतीची चिल्लर व इतर वस्तु तर सुहास भिवा राऊत रा.आंबिकानगर,ता. इंदापुर यांचे समर्थ मेडीकल अँन्ड डिस्ट्रीब्युटर या दुकानाचे देखील शटर उचकटुन चोरटयाने ६,८००/- रूपये रोख रक्कम व ३,०००/- रूपये, सागर शंकर तोरसकर रा.सुरवड ता.इंदापुर यांच्या ब्लु चिफ कॉम्युटरच्या दुकानातील गल्यातील २,२७५/- रूपये रोख रक्कम अशा विविध ठिकाणच्या दुकानातील रकमेवर चोरट्यांनी हात साफ केले असून मंगेश पांडुरंग राऊत रा. आंबिकानगर ता.इंदापुर यांचे राऊत अग्रो सव्हिसेस व गणेश नेवसे यांचे न्यु इंडीया इन्सुरन्स कं.प्रा.ली चे ऑफीस या दुकानाचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश केला आहे परंतु चोरट्यांना या ठिकाणी काही डल्ला मारता आला नाही.
दोन अज्ञात चोरट्यांनी आळीपाळीने ही सर्व चोरी केल्याचे सी.सी.टी.व्ही.मध्ये दिसत असून या अज्ञात चोरट्यांनी एकूण ८७६१५ रुपये रक्कमेची चोरी केली असल्या बाबत इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामभाऊ जगताप हे करत आहेत.