सावतामाळी नगर येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास
इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल
सावतामाळी नगर येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास
इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
इंदापूर शहरात गेल्या दोन दिवसात विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून टेंभुर्णी नाका परिसरातील चोरीच्या घटना ताज्या असतानाचं आणखी एक नवी घटना समोर आली आहे.इंदापूर शहरातील सावतामाळीनगर येथील उध्दव महादेव शिंदे वय वर्षे ३४ व्यवसाय मजूरी राहणार सावतामाळीनगर इंदापूर यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी 30,000/-रुपये रोख रक्कम, 20,000/रुपये किंमतीची अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, 2200/- रुपये किमतीचे चांदीचे दोन पैजन असा एकूण 52,200/- रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार इंदापूर पोलिसांत दाखल केली आहे.
उद्धव महादेव शिंदे यांनी आपल्या फिर्यादी जबाबात म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी माझी पत्नी मिनाक्षी, मुलगा मयुरेश,मुलगी गौरी राहणेस असुन मी कुल्पी ,आईसक्रीम व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन माझे कुटुंबाचा उदर्निवाह करतो.तसेच माझे सासरवाडी न्हावी ता. इंदापुर जि.पुणे येथे असुन सध्या कोरोना काळ असल्याने मी माझी पत्नी व मुलांना माझे न्हावी येथील सासरवाडीत ठेवले आहे.मी रोज न्हावी येथुन येवुन जावून करतो.तसेच माझे सावतामाळीनगर इंदापुर येथील घरी कोणीही राहणेस नसल्याने घराला कुलुप लावले आहे.मी अधुन मधुन येवुन घरात साफसफाई वगैरे करीत असतो.
मी दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वा.चे सुमारास घराला कुलुप लाऊन न्हावी येथे गेलो होतो. दि.24 रोजी सकाळी 9:00 वा.चे सुमारास मी न्हावी येथुन इंदापुर येथे येवुन नेहमीप्रमाणे इंदापुर नगरपालिकेचे भाजी विक्री मंडईत भाजीपाल्याचे दुकान लावले होते.दिवसभर भाजीपाला विक्री करुन मी सायंकाळी 5:00 वा.चे सुमारास भाजी विक्रीचे दुकान बंद करुन सावतामाळीनगर इंदापुर येथील घरी गेलो असता दाराचा कडी कोयंडा तोडुन बाजुच्या खिडकीत ठेवलेला तसेच दरवाजा उघडा असल्याचा दिसला. म्हणुन मी आतमध्ये जावुन पाहीले असता कपाट ठेवलेल्या आतील खोलीत कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटाचा व त्याचे लाॅकरचा दरवाजा उघडा असल्याचा दिसला. म्हणून मी कपाटाचे लाॅकरमध्ये ठेवलेले रोख रक्कम सोने व चांदीचे दागिने पाहीले असता ते तेथे मिळुन आले नाही नाहीत.म्हणून मी सदरचा घडलेला प्रकार माझे जवळच राहत असलेली माझी आई रंजना व शेजारी राहत असलेले शिर्के मॅडम व त्याची मुले चिनु व सुमित यांना सांगितला.त्यानंतर आम्ही आजुबाजुला सदरचा प्रकार घडतेवेळी कोणी पाहीला आहे का ? तसेच कोणी ओळखीचा माणसांनी हा प्रकार केला आहे का ? याबाबत माहीती घेतली परंतु काही एक उपयोगी माहीती मिळाली नाही. म्हणुन माझी खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन आतील खोलीत ठेवलेल्या कपाटाच्या लाॅकरमधील रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत.अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलिसात दिली आहे.