स्थानिक

वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक…

बारामती तालुक्यातील घटना..

वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक…

बारामती तालुक्यातील घटना..

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज अटक केली आहे. सदर घटना १६ ऑगस्ट रोजी मोरगाव येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात घडली होती.तेव्हापासून आरोपी फरार होते. या प्रकरणी विजया जगन्नाथ वाघ ( वय ७६) यांनी दिली होती.

अशी होती घटना….

सदर घटनेची हकीकत अशी की, बारामती तालुक्यातील मोरगाव येथील नीलकंठेश्वर मंदिर परिसरात १६ ऑगस्ट रोजी फिर्यादी वाघ यांच्या घरी येऊन तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्याची डिझाईन बघायची आहे. मला अशाच बांगड्या करायच्या आहेत.असा बहाणा करून चोरटे दागिने घेऊन पळून गेले होते. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात १ लाख २२ हजार रुपयेे किमतीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली होती.

चोरीचा माल हस्तगत…..

दाखल फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी सदर घटनेचा तपास करत आरोपी अनिल रघुनाथ बिरदावडे ( वय ४१), अशोक नामदेव गंगावणे ( वय ३०) दोघे रा.बांदलवाडी ता.बारामती. यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता बिरदावडे याने त्याच्या गावातील सुनील शिवाजी वायकर( वय ३५) याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील ४६ ग्रॅम वजनाच्या बांगड्या व पाटल्यासह गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.

Check Also
Close
Back to top button