स्थानिक

8 डिसेंबर 2020 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत

दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे.

8 डिसेंबर 2020 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत

सकाळी 11.00 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे.

बारामती वार्तापत्र 

मा. जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडील पत्रानुसार सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यानुसार दिनांक 8 डिसेंबर 2020 ही तारीख सरपंच आरक्षण सोडतीसाठी निश्चित करण्यात आली आहे.या आरक्षण सोडतीचे वेळी काढलेले आरक्षण हे सन 2020 – 25 या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी लागू राहणार आहे.
बारामती तालुक्यासाठीची आरक्षण सोडत ही दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे तहसिलदार बारामती यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे , आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram