बारामतीत नवरदेवासह डी.जे चालकावर गुन्हा दाखल……
बारामती तालुक्यातील घटना..
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मोढवे गावात लग्नसमारंभासाठी डी.जे लावल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवरदेवासह डी.जे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. नवरदेव सागर गायकवाड रा. (राजपुरेवस्ती.मोढवे.ता.बारामती, सध्या रा.सर्वे नंबर १६५, पंकज पार्क माळवाडी.पुणे) व रणजित देवकुळे (रा.धनकवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दिली.
सदर घटनेची हकीकत अशी की,सागर गायकवाड यांनी स्वतःच्या विवाह कार्यानिमित्त रणजित देवकुळे यांच्या मालकीचा डी.जे लावण्यात आला होता. या डी.जे वरून मोठ्या आवाजात गाणी वाजवली होती. तसेच या लग्न कार्यासाठी ५० ते ६० पेक्षा अधिक स्त्री व पुरुष कोणतेही सामाजिक अंतर न राखता एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा करीत होते. त्यामुळे मानवी जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याने हायगई व घातकीकृती केली.
डी.जे केला जप्त……
कोरोना संबंधी नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी ४ साऊंड बेस, १ साऊंड टॉप,२ पॉवर ऍम्प्लिफायर, साऊंड डी.जे मिक्सर व इतर लाईट साहित्य असा एकूण अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वारुळे करीत आहेत.