स्थानिक
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण.
वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण.
वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
बारामती:स्त्री शिक्षण आणि समानतेचा हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे आद्य समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कारभारी नगर,कसबा बारामती येथे धर्मरक्षक प्रतिष्ठन यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कारभारी नगर रोडच्या बाजूला बकुळ आणि कडूलिंब अशा १० स्वदेशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आकाश दामोदरे,शिवाजी जाधव, विकास चंदनशिवे,दिनेश गायकवाड,भार्गव पाटसकर,किरण भोसले,सागर जाधव,हर्षद गायकवाड,गणेश धावडे,मयूर कुंभार,आशिष साळुंके,समीर बनकर आदी उपस्थित होते.