बारामतीत माळवादी घराला आग
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील तावरे बंगला येथील कुलकर्णी वडेवाले यांच्या जुन्या सागवानी लाकडी माळवादी वाड्याला आग लागली असून अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली येथील कॅनल शेजारी असणाऱ्या कुलकर्णी वडेवाले यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या जुन्या वाड्याला आग लागली त्यांनी वडापाव विक्रीसाठी घरात जुनी रद्दी ठेवली होती त्याला आग लागून रद्दी ने पेट घेतला व बघता बघता ही आग उग्ररूप धारण करू लागली मात्र अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली यामध्ये घराचे साधारण 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे दिसत आहे आगीचे बंब वेळेत पोहोचले नसते तर वाऱ्याचा असणारा वेग यामुळे आगीने उग्र रूप धारण केले असते मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वित्तहानी व जीवित हानी टळली याठिकाणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ पौर्णिमाताई तावरे यांच्यासह मुख्याधिकारी किरणराज यादव हे जातीने उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना सूचना करत होते अग्निशामन दलाचे प्रमुख महेश आगवणे, विजय शितोळे फायरमन प्रदीप लालबिगे, दिपक अहिवळे, मोहन शिंदे, अक्षय माने, निखिल कागडा, ड्रायव्हर शैलेश सोनवणे, निवृत्ती जाधव, योगेश सोनवणे यांनी आग विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.