दौंड

केडगावमध्ये ४०४ बाटली उच्चांकी रक्तदान शिबिर उत्साहात

विविध संघटनांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिरे घेणे काळाची गरज आहे

केडगावमध्ये ४०४ बाटली उच्चांकी रक्तदान शिबिर उत्साहात

विविध संघटनांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिरे घेणे काळाची गरज आहे

यवत;बारामती वार्तापत्र

सध्या कोरोना काळामध्ये दौंड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताची कमी भासत असल्यामुळे आज केडगांव स्टेशन लालचंदनगर येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात दिवसभरात एकूण ४०४ बॉटल रक्तदान झाले.
सदर शिबिराचे आयोजक समस्त ग्रामस्थ केडगाव-बोरीपार्धी, जैन श्रावक संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, साई ग्रुप दौंड तालुका, कोवीड हेल्पसेंटर ग्रुप,दौंड तालुका पत्रकार संघ, भारतीय जैन संघटना केडगाव स्टेशन, एकमित्र एकवृक्ष ग्रुप केडगांव यांनी केले होते.
या कार्यक्रम दरम्यान उपस्थिती दौंड चे आमदार अॕड.राहुलदादा कुल, मा.आमदार रमेशआप्पा थोरात, सभापती सौ.राणीताई शेळके, मा.सभापती दिलिपजी हंडाळ, पुणे जिल्हा भारतीय जैन संघाचे अध्यक्ष सचिन बोगावत, उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, मराठा महासंघ जिल्हा सचिव मयुरआबा सोळसकर, केडगाव चे सरपंच अजितकुमार शेलार पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्व.रखमाबाई ताडगेप्रतिष्ठान च्यावतिने २५ कोरोनायोध्दा सन्मानपत्र मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल ताडगे यांच्या हस्ते देण्यात आले. रक्तदात्यास पाणीजार, प्रमाणपत्र व मास्क भेट देण्यात आला. केडगाव ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः रक्तदान करुन सहभाग घेतला ग्रामपंचायत सदस्य नितिन जगताप यांनी प्रथम रक्तदान करुन सुरुवात केली.
संपूर्ण रक्तदानाचे नियोजन धनराज मासाळ, समीर पठाण, प्रीतम गांधी, नितिन जगताप, संदिप कोठारी, सुनिल सोडनवर, कृष्णा फरगडे, महेश गडधे, श्रीकांत हंडाळ, सलमान खान यांनी केले होते.
सदर रक्तदानाला जागा नवकार ग्रुप लालचंदनगर यांनी उपलब्ध करुन दिली.यावेळी वरील आयोजक सर्व संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सहकारी तसेच सर्व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते. दौंड रोटरी ब्लड बँक व संजीवनी ब्लड बँक भोसरी निशांत ढोले यांनी रक्त संकलित केले.
कोवीड हेल्पसेंटर ग्रुप च्या माध्यमातून एकत्रित येऊन सामाजिक कार्य चालुच आहे.सध्या प्लाझमा प्रमाणे रक्ताचीही जिल्ह्यात गरज आहे हे ओळखून केडगांवला रक्तदानाचे नियोजन केले असेच तालुक्यातील प्रत्येक गावात विविध संघटनांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिरे घेणे काळाची गरज आहे असे हर्षलजी भटेवरा व मयुरआबा सोळसकर यांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!