माळेगाव बु
आईनेच केला आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा खून पोलीस तपासात झाले निष्पन्न
तिसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच केला खून
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/11/image_search_1606663012763-780x448.jpg)
आईनेच केला आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा खून पोलीस तपासात झाले निष्पन्न
तिसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच केला खून
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे दि 25 नोव्हेंबर रोजी सहा महिन्याच्या मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती या खुणा प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपास केला पोलिसांना तपासा अंती मुलीच्या आईनेच सव्वा महिन्याच्या आपल्या मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी आई दिपाली झगडे हिला अटक केली आहे तिची पोलिस कस्टडी घेण्यात येणार आहे सदर गुन्ह्याचा तपास एपीआय विधाते हे करीत असल्याची माहिती बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.