श्री सोमेश्वर कारखान्याने मारली बाजी 28O8 रुपये एकरकमी एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार
ही माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
श्री सोमेश्वर कारखान्याने मारली बाजी 28O8 रुपये एकरकमी एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार
ही माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
कारखाना म्हटले की एफआरपीच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची तळमळ आलीच, अनेक ठिकाणी शेतकरी किंवा विरोधक 14 दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 30 नोव्हेंबर पर्यंत कारखान्यात गळीतास आलेल्या आपल्या उसाला प्रति टन 2808,,रुपये रक्कम देणार आहे
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सन २०२०-२०२१ करीता गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची प्र.मे.टन रु.२८०८/- प्रमाणे एकरकमी एफ.आर.पी वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, सध्या कोरोना, लॉकडाऊन अतिवृष्टी या ऐकापाठोपाठ आलेल्या अडचणीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने दि.३०/११/२०२० पर्यंत गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची एकरकमी एफ.आर.पी. सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून लवकरच रक्कम सभासदांना अदा केली जाईल. अडीअडचणीच्या प्रत्येक वेळी सभासद व कारखाना हे दोघेही एकमेकांसाठी उभे रहात असून “अभिमान याचा, सोमेश्वर माझा” या उक्तीप्रमाणे आपली संस्था वाटचाल करीत असल्याचे गौरोउद्गार सभासदांमध्ये असून याचा आम्हा संचालक मंडळास सार्थ अभिमान असल्याचे श्री.जगताप म्हणाले. श्री जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने आजअखेर २ लाख ८ हजार ३४५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून संपुर्ण पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा १०.३० टक्के साखर ऊतारा मिळवीत २ लाख १० हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तसेच कारखान्याच्या को-जनरेशन मधून १ कोटी ९० लाख ५८ हजार ३३९ युनिट्स विजनिर्मिती केली असून १ कोटी २७ लाख ३० हजार युनिट्स विज विक्री केली आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून सरासरी २७२.४२ ची रिकव्हरी मिळवत १४ लाख ९६ हजार ६०५ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून २ लाख ५५ हजार ९६ लिटर्स इथेनॉलची निर्मिती केलेली आहे.श्री.जगताप पुढे म्हणाले की, आपल्या श्री सोमेश्वर कारखान्याकडे ३३ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून या गाळप हंगामात अंदाजे १२ लाख मे.टनाच्या आसपास गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कारखान्याच्या शेतकी विभागाने
वर्तविली आहे. या हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आपणासमोर आहे. यापैकी काही ऊस इतर कारखान्यांना देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून उर्वरीत संपुर्ण ऊस वेळेत गाळण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊसतोड यंत्रणा दाखल झाली असून हार्वेस्टर यंत्राणेही सभासदांची ऊसतोड सुरळीत सुरु आहे. श्री.जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याकडे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या दृष्टीने आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता
फडीत. हंगामात ७५०० मे.टन प्रती दिनी वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याबरोबर कारखान्याने डिस्टीलरीचा वाढीव प्रकल्प हाती घेवून ज्यादा क्षमतेने इथेनॉल निर्मिती करुन सभासदांना अधिकचा मोबदला कसा देता येईल याचाही संचालक मंडळ प्रयत्न करत आहे.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, गतवर्षीप्रमाणे आपणा सर्वांच्या सहकार्याने सुरु असणारा सन २०२०-२०२१ चा हा गाळप हंगामही आपण सर्वच बाबतीत यशस्वीरित्या पार पाडू असा मला विश्वास आहे.