मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहीर
मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहीर
मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.
बारामती वार्तापत्र
मा.भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशष पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर कार्यक्रमास मा.भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 30 सप्टेंबर 2020 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रुटी दूर करणे (यादी भागातील दुबार / समान नोंदी संदर्भातील त्रुटी दिनांक 31/8/2020 पर्यंत करणे), विभाग / भाग पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या/ भागांच्या सीमेच्या पुर्नरचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्राची यादी मंजूर करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले होते.
पुनरिक्षण उपक्रमामध्ये दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. दि.17 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणे. दिनांक 5 व 6 डिसेंबर 2020 आणि 12 व 13 डिसेंबर 2020 हा विशेष मोहिमांचा कालावधी . दिनांक 5 जानेवारी 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. दिनांक 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे व डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे. दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.