बारामतीतील गणेश भाजी मार्केट उद्या बंद
शेतकऱ्यांच्या आंदोलनास भाजी विक्रेत्यांचा पाठिंबा
बारामती वार्तापत्र
कृषी विषयक कायद्यातिल जाचक तरतुदी त्याविरोधात दिल्लीमध्ये शेतकरी संघटनांनी रान उठवले आहे त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले असताना राज्यातील अनेक शेतकरी संघटना या भारत बंदला पाठिंबा देत आहेत त्याचबरोबरीने बारामतीतील गणेश भाजी मार्केट मधील भाजीविक्रेते यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ या आंदोलनास पाठिंबा देत उद्याच्या भारत बंद मध्ये सहभाग नोंदवत भाजी मार्केट बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी आम्ही या बंदमध्ये सहभागी आहोत असे निवेदन गणेश भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाला निवेदन देऊन भाजी मार्केट बंद करणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी चिऊशेठ जंजिरे, बबलू बागवान ,गणेश कदम ,ज्ञानेश्वर गवळी ,कयूम बागवान, यासीन बागवान, बाळासाहेब झगडे ,सीमा अहिवळे ,अजहर शेख ,जावेद बागवान या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.