पवार साहेबांच्या ‘ त्या ‘ पत्रावर आमदार रोहित पवार यांनी दिले हे उत्तर
आजची भूमिका यामध्ये कशी फारकत घेतात हे दाखवण्याचा प्रयत्न
पवार साहेबांच्या ‘ त्या ‘ पत्रावर आमदार रोहित पवार यांनी दिले हे उत्तर
आजची भूमिका यामध्ये कशी फारकत घेतात हे दाखवण्याचा प्रयत्न
बारामती वार्तापत्र
विकास कामांविषयी अत्यंत दक्ष असलेले, बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन समाज मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावरही तेवढेच व्यक्त होत असतात. वेगवेगळ्या विषयांवर, राजकीय घडामोडींवर ते नेहमी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले मत, विचार व्यक्त करत असतात.सध्या कृषी विधेयकावरून शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे तसेच संपूर्ण भारतातही त्याचे लोण पसरले आहे असे असताना भाजपनेही पक्षाची भूमिका सांभाळताना हे विधेयक कसे रस्ता आहे याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत खा. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्याविषयी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे यातून शरद पवार हे त्यावेळेची भूमिका आणि आजची भूमिका यामध्ये कशी फारकत घेतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी शेतमालाच्या हमीभावा विषयी ट्विटरवरून मागणी करणारे ट्विट त्यांनी समोर आणले आहे
यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री असताना ची वेगळी भूमिका आणी आज देशाचे सर्वेसर्वा पंतप्रधान असताना वेगळी भूमिका का असा सवाल करत तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेली मागणी आणि आताही शेतकरी हमीभावासाठी लढताहेत मग या विषयी वेगळी भूमिका का असा सवाल करत भाजपच्या नेत्यांनी त्यांचीच दुटप्पी भुमीका त्यांनी शोधावी असा सल्ला दिला आहे.