मी महाविकास आघाडीत जाणार नाही; मीडियाने या चर्चेला पूर्णविराम द्यावा-महादेव जानकर
पवार यांच्याशी झालेली ती भेट राजकीय नव्हती....
मी महाविकास आघाडीत जाणार नाही; मीडियाने या चर्चेला पूर्णविराम द्यावा-महादेव जानकर
पवार यांच्याशी झालेली ती भेट राजकीय नव्हती….
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली मात्र आज महादेव जाणकर यांनी या चर्चेला मिडियाने पूर्ण विराम द्यावा असे सांगत माझी महाविकास आघाडीला गरज नाही माझा फक्त एक आमदार आहे असे स्पष्टीकरण दिले .
महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खडकवासल्यात जानकरांना चांगली मते मिळाली होती. तर इंदापूर आणि भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना जेमतेम मते मिळाली होती. बारामतीत सुप्रिया यांना एक लाख ४२ हजार ६२८ मते, तर जानकर यांना अवघी ५२ हजार मते मिळू शकली. बारामतीने त्यावेळी सुप्रिया यांना साथ दिली नसती तर निकालाचे चित्रं काही वेगळं दिसलं असतं असं बोललं जातं. या निवडणुकीमुळे जानकर चांगलेच चर्चेत आले होते.