आपला जिल्हा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ला तर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ला तर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

बुलडाणा:बारामती वार्तापत्र 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जनसंपर्क कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांचे स्वीय सहाय्यक सौरभ जखमी झाले आहेत. आरोपी जनार्धन गाडेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तक्रार देण्यासाठी तुपकर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते, रविकांत तुपकर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसोबत उभे असताना आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला केला आहे, तर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
खरं तर रविकांत तुपकर हे बुधवारी तीन तालुक्यांचा दौरा करून सायंकाळी बुलडाण्यात परतले. त्यानंतर ते त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्याकडे आलेल्या लोकांना निरोप देण्यासाठी ते बाहेर आले असता एक व्यक्ती त्यांच्या वाहनाचा नंबर नोंदवून घेत होता. यावेळी रविकांत तुपकर यांचे स्वीय सहाय्यक सौरभ पडघान यांनी संबंधिताकडे विचारणा केली, त्यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर जनार्धन दगडू गाडेकर यांनी कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार त्यांचे अंगरक्षक गणेश चाटे यांनी थांबवला.
मात्र दुसरा वार गाडेकर यांनी केला असता, कुऱ्हाड उलट्या बाजूने सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तेथे गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने रविकांत तुपकर थोडक्यात बचावले. सौरभ पडघा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी जनार्धन दगडू गाडेकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील कुऱ्हाड आणि अन्य हत्यारही ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न तथा अंगरक्षक असलेल्या पोलिसाला त्याच्या कर्तव्यापासून रोखल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा यासह अन्य कलमान्वये या प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram