जीवन सुंदर बनविण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा ! -सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज
७३ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता
जीवन सुंदर बनविण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा ! -सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज
७३ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता
बारामती वार्तापत्र
जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी दिव्य गुणांचा स्रोत असलेल्या परमात्म्याशी नाते जोडा, असे विचार सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात मांडले.
७३ व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाली. या संत समागमाचा लाभ जगभरातील लाखो भाविकांनी घेतला.
सदगुरू माता सुदिक्षाजी पुढे म्हणाल्या, जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आहे. शाश्वत आणि एकरस आहे. जेव्हा आपण आपले नाते त्याच्याशी जोडून ठेवता तेव्हा मनामध्येही स्थैर्य येऊन विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढते. यामुळे जीवनातील चढ-उतारांचा सामना आपण सहजपणे करू शकतो. पहिल्या दिवशी सद्गुरू मताजींनी मानवतेच्या नावे संदेश प्रेषित करून समागमाचे उदघाटन केले. दुसऱ्या दिवशी सेवादल रॅलीत देश विदेशातील सेवादल बंधू भगिनींनी सेवादल प्रार्थना, कवायत, खेळ तसेच विविध भाषांमध्ये लघुनाटिकेच्या माध्यमातून मिशनचा संदेश प्रस्तुत केला.
प्रवचनाच्या शेवटी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज म्हणाल्या हा ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम आपापल्या घरांमध्ये बसूनच व्हर्च्युअल रुपात लक्षावधी भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला आणि पुढील समागम प्रत्यक्ष रुपात मैदानावर आयोजित व्हावा अशी मनोमन प्रार्थनाही केली.