वाढदिवस खाकी वर्दीतील ‘ राजा ‘ माणसाचा
डि.वाय.एस.पी, नारायण शिरगांवकर यांचा
बारामती वार्तापत्र
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन सर्वसामान्य जनतेला पोलीस खात्याविषयी आपलेपणाची भावना जागृत करण्याचे काम करणारे पुणे जिल्हा पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष, समाजातील तळातल्या नागरिकाला होणारे दुःख, वेदना याविषयी जाणीव ठेवणारा खाकी वर्दीच्या आत दडलेला एक प्रेमळ माणुस म्हणजेच बारामती उपविभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर.आज त्यांचा जन्म दिवस
शिरगावकर साहेबांना बारामती वार्तापत्र च्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा….
मूळचे सांगली जिल्ह्यातील रेठरे ता. वाळवा, या गावातील रहिवासी असणारे शिरगावकर साहेब यांनी बारामती उपविभागात पोलीस उपाधिक्षक म्हणून चार्ज घेतल्यापासून पोलीस दला विषयी सर्वसामान्य माणसाच्या मनातील प्रतिमा उजळण्याचे काम शिरगावकर साहेबांनी केले.त्यांच्या कार्यकाळात कोरोना महामारीत मार्चपासून सुरू झालेल्या लॉक डाऊन च्या कालावधीत सामान्य माणसाने घरीच बसून राहावे यासाठी आपली ताकद पणाला लावली.सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात त्यासाठी त्यांनी बारामती शहर व तालुक्यात व्हाट्सअपचे भाजीविक्रेत्यांचे व किराणा दुकानदार यांचे ग्रुप तयार करून लोकांनी घरी बसूनच भाजी मागवावी,ती भाजी घरपोच मिळेल याविषयीची सर्व खबरदारी घेतली. या कालावधीत महसूल प्रशासनाबरोबरच पोलिसांनीही विशेष श्रम घेतले त्यात शिरगावकर साहेबांचा मोलाचा वाटा होता. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर बारामती पॅटर्न या नावाने करोना निर्मुलनाची मोहीम सुरू झाली.
पोलिसांकडून कोरोना विषयी च्या वेळोवेळी अपडेट घेणे ,रूट मार्च घेऊन जनतेत शांततेचे आवाहन करणे, नियम पाळावे यासाठी जागृती करणे ,व्हाट्सअप ,फेसबुक, रेडीओ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला घरीच बसून राहण्याचे आवाहन केले. बारामतीच्या एमआयडीसी येथे लॉकडाउनच्या कालावधीत अडकलेले परराज्यातील ड्रायव्हर व परप्रांतीय मजूर यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोचविणे व त्यांना जेवणाची व्यवस्था करणे ही सुद्धा कामे त्यांनी केली.
सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना पुरात आपलं सर्वस्व गमावलेल्या सामान्य शेतकरी, कष्टकरी माणसाला त्यांनी बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सांगली येथे जाऊन जीवनावश्यक वस्तू, कपडे हे तर दिलेच मात्र पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कामही त्यांनी केले. बारामतीतील नदीला आलेल्या पुराच्या वेळीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उत्तम कामगिरी केली.
निवडणुकीच्या काळातही चोख बंदोबस्त ठेऊन कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याविषयी दक्ष राहून आपल्या सर्व पोलीस बांधवांच्या मदतीने महत्वाची भूमिका पार पाडली. हे सर्व सामाजिक बाबतीत झाले मात्र बारामतीत असणारे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली होती त्याचाही बिमोड करण्यात त्यांना यश आले.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील चालणारी गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली. त्याचबरोबर एम आय डी सी बारामती येथे छोट्या ,छोट्या व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांनाही त्यांनी जेरीस आणले. खून ,दरोडे ,चोऱ्या, मारामाऱ्या,करणाऱ्या सक्रीय टोळ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत कारवाई करून मोक्का लावला. त्यामुळे गुन्हेगारांची पळताभुई थोडी झाली व एकंदरीतच गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले.
सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये आल्यास त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ते सदैव दक्ष असतात. नागरिकांच्या आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठीही ते तत्पर असतात.
सामान्य माणूस पोलीस चौकीवर तक्रार अर्ज देण्याच्या अगोदर शिरगावकर साहेबांच्या कार्यालयात अगोदर अर्ज देतो.कारण त्यांना या तक्रारीवर कायदेशीर कारवाई होणार याविषयीची पक्की खात्री असते. अशा या खाकी वर्दीतील ‘ राजा ‘ माणसाला बारामती वार्ता पत्राचा मानाचा मुजरा.
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांची यापुढील कारकीर्द ही अशीच उत्तुंग यशाने भरलेली राहावी यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा……