सायकल रॅलीत अधिकारी, उद्योगपती यांचेसह पत्रकारांनीही मारली बाजी
तब्बल 85 किलोमीटर आंतर
बारामती वार्तापत्र
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया व बारामती सायकल क्लब यांच्यावतीने पवार साहेबांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 81 किलोमीटर अंतर असलेली बारामती निरा बारामती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ,सामान्य माणूस, महिला, व्यावसायिक ,उद्योजक ,क्लासवन अधिकारी, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, डीवायएसपी नारायण शिरगावकर यांच्यासह आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी ,पत्रकार , जितेंद्र जाधव यांनीदेखील सहभाग घेतला होता सकाळी सहा वाजता सुरू झालेली रॅलीमध्ये 08:02 नीरा येथे नाव नोंदणी केल्यानंतर त्यांनी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी ही रॅली पूर्ण केली तब्बल 85 किलोमीटर आंतर त्यांनी पूर्ण केले आहे.