डायलेसिस रुग्णांची सोय आता बारामतीच्या शासकीय रुग्णालयात होणार
या साठी वेगळा आरओ प्लँट देखील कोविड निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे.
डायलेसिस रुग्णांची सोय आता बारामतीच्या शासकीय रुग्णालयात होणार
या साठी वेगळा आरओ प्लँट देखील कोविड निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे.
बारामती वार्तापत्र
सर्वसाधारण व कोरोनाग्रस्तांसह ज्यांना रक्तातील काविळ आहे व जे कोरोनाग्रस्त आहे, अशा रुग्णांसाठी डायलिसीस ची सोय आता बारामतीत होणार आहे. बारामतीकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.
बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात दोन तर एमआयडीसीतील महिला रुग्णालयात दोन अशी चार डायलिसीस मशीन्स आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांच्या सेवेत उपलब्ध करुन दिली आहेत. या मुळे बारामतीच नव्हे तर अजु बाजूच्या रुग्णांची डायलिसीस रुग्णांची सोय या निमित्ताने होणार असून पुण्याला त्यासाठी जाण्याची गरज नाही त्यामुळे यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
सुरुवातीला सिल्वर ज्युबली रुग्णालयात डायलिसीस सुविधा सुरु झाली, मात्र कोरोनामुळे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये झाल्याने सर्वसाधारण रुग्णांसाठीची ही डायलिसीस सुविधा बंद करण्यात आली होती. आता मात्र ज्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना डायलिसीसची गरज असेल तर त्याला या दोनपैकी एक मशीन वापरण्यात येणार आहे, तर एचबीएसएजी ही रक्तातील काविळ असलेल्या कोविड रुग्णांच्या डायलिसीससाठी वापरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. बारामतीत सुदैवाने असे दोन्हीही रुग्ण आढळलेले नव्हते, आता मात्र असे रुग्ण आले तरी त्यांचे बारामतीतच डायलिसीस करणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर ज्या रुग्णांना एचआयव्ही, एचबीएसएजी, हिपॅटायसिस सी व कोविड नाही अशा इतर रुग्णांसाठी महिला रुग्णालयात अजित पवार यांनी दोन डायलिसीस मशीन उपलब्ध करुन दिल्या. या साठी वेगळा आरओ प्लँट देखील कोविड निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात दोन व दुपारच्या सत्रात दोन असे चार रुग्ण दररोज (रविवार वगळता) या डायलिसीस सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
यांच्याशी साधा संपर्क
👉 डॉ. सदानंद काळे- वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबीली रुग्णालय- 9689154522
👉डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी, महिला ग्रामीण रुग्णालय- 9860461807
👉शिवानी गायकवाड- डायलिसीस टेक्निशियन- 9067520715
👉 श्रीमती थोरात- परिचारिका- 7887451223
कोणी कोठे संपर्क करावा.
👉कोरोनाग्रस्त व रक्तातील काविळ असलेले कोरोनाग्रस्त- सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय
👉एचआयव्ही, हिपॅटायसिस सी, कोविड, एचबीएसएजी काविळ नसलेल्या सर्वांनी एमआयडीसीतील महिला रुग्णालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे