स्थानिक

14000 एन्जोप्लास्टी आणि 2 लाख रुग्णांना मोफत उपचार करणारे बारामतीचे हॉस्पिटल

रा.तू भोईटे स्मृती प्रतिष्ठान व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रमेश भोईटे यांच्या माध्यमातून

14000 एन्जोप्लास्टी आणि 2 लाख रुग्णांना मोफत उपचार करणारे बारामतीचे हॉस्पिटल

रा.तू भोईटे स्मृती प्रतिष्ठान व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रमेश भोईटे यांच्या माध्यमातून

बारामती वार्तापत्र
सामान्य गरीब माणसाला दवाखान्याची पायरी चढायची म्हटलं की पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. खाजगी दवाखान्यात पैशांशिवाय पान हलत नाही याचा प्रत्यय आजपर्यंत अनेक लोकांना आलेला असेल.वेगवेगळ्या कारणास्तव रोगांवर होणारे उपचार महाग झालेत मात्र बारामती येथील ‘गिरीराज हॉस्पिटल ‘ च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू व गरीब लोकांवर उपचार केले जातात.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारसाहेब व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीच्या गिरीराज हॉस्पिटल च्या माध्यमातून तसेच आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून व अनंत मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने आत्तापर्यंत 14000 एन्जोप्लास्टी झाल्या असुन, अडीच हजार बायपास शस्त्रक्रिया, दोन लाख लोकांना मोफत उपचार आत्तापर्यंत केले आहेत. रा.तू भोईटे स्मृती प्रतिष्ठान व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रमेश भोईटे यांच्या माध्यमातून या सर्व शस्त्रक्रिया व उपचार रुग्णांना मोफत केले जातात.

सामाजिक बांधिलकी व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतुने व भावनेतून सामान्य नागरिकांना उपचार केले जातात. व रुग्णांची तज्ञ स्टाप च्या वतीने काळजी घेतली जाते .यावर्षी 1500 रुग्णांची ऍन्जिओग्राफी केली असून 750 रुग्णांची एन्जोप्लास्टी 324 शिबीरातुन मोफत केल्याची माहिती गिरीराज हॉस्पिटल चे चेअरमन डॉक्टर रमेश भोईटे यांनी दिली. अजूनही ही मोहीम चालू असून ज्या रुग्णांना ऍन्जिओग्राफी ,अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी करायची असेल त्या गरजु रुग्णांनी पूर्व तपासणीचे रिपोर्ट व औषधे , रेशन कार्ड पिवळे /केसरी , आधार कार्ड /मतदान कार्ड ही कागदपत्रे आणावीत वरुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button