दौंड येथील सुमारे २ महिन्यापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामागिरी
सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले असून खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.

दौंड येथील सुमारे २ महिन्यापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामागिरी
सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले असून खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
बारामती वार्तापत्र
दि.३/१०/२०२० रोजी सायं ०७.०० वा. ते ४/१०/२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे लिंगाळी ता.दौंड गावच्या हद्दीत खडकवासला उपफाटा बंद कॅनलवर मोरीजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून यातील (मयत) केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत वय ४५ रा.शालीमार चौक दौंड ता.दौंड जि.पुणे याचे डोक्यात दारूची बाटली मारून व दगडाने टाकुन खुन केलेला होता. त्याबाबत दौंड पो.स्टे . गु.र.नं. ४७३/२०२० भादंवि क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या बातमीनुसार जबरी चोरीचे गुन्हयातील माल विकणेसाठी आलेले आरोपी नामे १.ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे २.राजेश संभाजी बिबे वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड ३.अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे ४.विशाल दिलीप आटोळे वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे या चौघांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ पल्सर मोटरसायकल, चोरीच्या २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा किं.रु. २,२६,२७०/- चा माल हस्तगत केलेला होता. चौकशीत आरोपींकडून दौंड पो.स्टे. चे लिप्ट देण्याचे बहाण्याने लुटमार केल्याचे २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले होते.
दौंड पो.स्टे.चे सुमारे दोन महिन्यापूर्वीचे उघडकीस न आलेल्या वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने सदर आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यातील आरोपी नामे –
१) राजेश संभाजी बिबे वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा . माळेवाडी ता.जि.बिड
२) अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे या दोघांनी मिळून रेल्वेस्टेशनचे जवळून दौंडमध्ये राहणा-या एका व्यक्तीस सदर गुन्हयाचे घटनास्थळी नेवून चोरीचे उद्देशाने त्याची पॅट काढून त्यास दगडाने मारल्याचे सांगितले आहे. त्यावरुन सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले असून खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक नारायण पवार,
सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,
पोना. गुरू गायकवाड,
पोना. सुभाष राऊत,
पोकॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.






