स्था.गु.शा. पुणे ग्रामिण यांची कामगीरी मोटार सायकल चोरीचे 9 गुन्हे उघड व 13 मोटार सायकली जप्त.
सापळा रचुन दोन संशयीत इसम व त्यांचेकडील मोटार सायकली ताब्यात
स्था.गु.शा. पुणे ग्रामिण यांची कामगीरी मोटार सायकल चोरीचे 9 गुन्हे उघड व 13 मोटार सायकली जप्त.
सापळा रचुन दोन संशयीत इसम व त्यांचेकडील मोटार सायकली ताब्यात
बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट
आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मा. पोलिस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख सो यांजकडून दरोडा, जबरी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करणे करीता मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्याने वरील आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पुणे ग्रामीण चे खेड-जुन्नर पथक आज दिनांक 17/12/2020 रोजी वरील प्रमाणे गुन्हे उघड आणण्या करीता स्था.गु.शा. पुणे ग्रामिण चे जुन्नर खेड पथक पेट्रोलिंग करत असताना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि एक इसम मोटार सायकल चोरीतील मोटार सायकल विक्री करण्या करीता पारगाव तर्फे आळे येथे येणार आहे त्या अनुषंगाने पारगाव तर्फे आळे येथे जावुन सापळा रचुन दोन संशयीत इसम व त्यांचेकडील मोटार सायकली ताब्यात घेउन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सचिन बाळु दिघे वय 31 वर्ष. रा. ढगेवाडी, पळसपुर ता. पारनेर जि. अहमदनगर व 2) ऋशीकेष किसन दरेकर वय 20 वर्ष. रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे. असे सांगितले असता त्यांची व त्यांचेकडे असणारे मो.सा. ची त्यांचेकडे चौकशी केली असता सदर मोटार सायकल हया आळेफाटा व नारायणगाव परीसरातुन चोरुन आणलेल्या असल्याचे समजले सदर बाबत संबधीत पो.स्टे.कडे खात्री करता त्या बाबत गुन्हे दाखल असल्याचे समजले तरी सदर संषयीत इसमांकडे सखोल चैकषी केली असता त्यांनी त्यांचा मित्र अशिष बेल्हेकर नाव पत्ता माहिती नाही. याचे मदतीने चोरी केलेल्या व विक्री करण्या करीता जवळ बाळगलेल्या एकुण 13 मोटार सायकली किंमत अंदाजे 3,05,000/- रु. किंमतीच्या मोटार सायकली काढुन दिल्या त्या सर्व मोटार सायकली जप्ती पंचनाम्याने जप्त करुन, आरोपी व जप्त मुददेमाल रिपोर्टाने नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाही करीता दिलेल्या आहेत. सदर कार्यवाहीत खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत.
१) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 399/2020 भा.द.वि.क. 379
२) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 397/2020 भा.द.वि.क. 379
३) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 398/2020 भा.द.वि.क. 379
४) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 409/2020 भा.द.वि.क. 379
५) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 350/2020 भा.द.वि.क. 379
६) आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 418/2020 भा.द.वि.क. 379
७) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 735/2020 भा.द.वि.क. 379
८) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 708/2020 भा.द.वि.क. 379
९) अकोले अ.नगर पो.स्टे. गु.र.नं. 685/2020 भा.द.वि.क. 379
येणे प्रमाणे वरील ९ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सो, उप.विभा.पो.अधिकारी. मंदार जवळे. सोा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे आदेशाने व सुचने नुसार स.पो.नि. एन. एस. गंधारे
पो.हवा. विक्रम तापकीर ,पो.ना. दिपक साबळे,पो.कॉं. संदिप वारे,पो.काँ. निलेश सुपेकर. ,पो.काँ. दगडु विरकर. ,पो.हवा. सचिन गायकवाड,पो.हवा. पासलकर,पो.ना. राजु मोमीन ,पो.काॅ. अक्षय नवले. यांनी केली आहे..