सावित्रीबाई फुले जयंतीदिनी इंदापूरात सर्वरोग निदान शिबीर
महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या बैठकीत निर्णय
सावित्रीबाई फुले जयंतीदिनी इंदापूरात सर्वरोग निदान शिबीर
महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या बैठकीत निर्णय
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्था इंदापूर यांचे वतीने दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी इंदापूर येथे बैठकीत बोलताना दिली.
इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावीत्रीबाई फुले यांची 190 वी जयंती व सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्याबाबत तालुक्यातील पदाधीकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी पांडुरंग शिंदे बोलत होते.यावेळी भाजपाचे मा.पंचायतराज आघाडी प्रदेश सरचिटणीस युवराज मस्के, बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाधव, भारत नारायण मिसाळ, नाभिक संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष अवधुत पवार,माधवीताई सोननिस,मुकुदीनी कडवळे,संगीताताई क्षीरसागर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
सर्वरोगनिदान निदान शिबीराचे उदघाटन अकलुज येथील प्रसिद्ध डाॅ.एम.के. इनामदार यांचे हस्ते होणार आहे.तर अकलुज येथील सहा स्पेशालिष्ट डाॅक्टरांचे पथक व इंदापूर तालुक्यातील तज्ञ डाॅक्टरांकडुन शिबीरात सहभागी शिबीरार्थीची वेगवेगळ्या आजाराबाबतची तपासणी ही 3 जानेवारी 2021 मोफत केली जाणार आहे.तपासणीसाठी कसलीही फी आकारली जाणार नसल्याने तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी शिबीरात उपस्थित राहुन आपली मोफत रोगनिदान तपासणी करून घेण्याचे आवाहन पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.यावेळी गणेश जाधव,नागनाथ व्यवहारे, अशोक व्यवहारे, शिवराज भिसे, चंद्रकांत शेंडे, आदित्य बोराटे, राजेंद्र शिंदे, अंबादास व्यवहारे, इन्नुस बेपारी, मारूती शिंदे, महेश ढगे, नवनाथ शिंदे, जतिन पटेल, विशाल थोरात,विशाल राऊत, सुधाकर बोराटे यांचेसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.