इंदापूर

इंदापुरात घडली हृदयद्रावक घटना; बापाने केली दोन महिन्याच्या चिमुरडीची हत्या

पोलिसांनी नराधमाला केली अटक

इंदापुरात घडली हृदयद्रावक घटना; बापाने केली दोन महिन्याच्या चिमुरडीची हत्या

पोलिसांनी नराधमाला केली अटक

इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे बापानेच स्वतःच्या दोन महिन्याच्या चिमुरडीचा अंत केला आहे.ही घटना दि.२३ नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे.

आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भांबूरे गावचा रहिवासी असून तो त्याच्या कुटुंबासमवेत इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे ऊस तोडणी कामानिमित्त आला होता.सविस्तर हकीकत अशी की, दिनांक २२ नोव्हेंबर च्या रात्री आरोपी सुकट्या उर्फ चिंटू उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे हा ऊसतोड करून कोपीवर आल्यानंतर तू माझ्या सोबत तोडलेल्या उसाची मोळी बांधायला का आली नाही असे म्हणत आरोपीने पत्नी सोनम हिच्यासोबत भांडण करत धारदार शस्त्र हातात घेऊन अंगावरती जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पाच च्या सुमारास या नराधमाने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची नाक व तोंड दाबून क्रुररित्या हत्या केली. ही हत्या करीत असताना जागे झालेल्या आईने आरडाओरडा केला असता शेजारीच असणाऱ्या ऊस तोडणी कामगारांनी या ठिकाणी धाव घेतली असता आरोपी शक्तिमान काळे हा अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेला.आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आपला नवराच क्रूरपणे अंत करीत असतानाचे दृश्य पाहिल्याने या आईला मानसिक धक्का बसला. त्यामुळे पोलीस ठाण्यात फक्त मयताची खबर दिली गेली.मात्र काल रात्री फिर्यादी आई सोनम काळे यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगून गुन्हा दाखल केला आहे.

सुकट्या उर्फ चिंटू उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क.३०२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी शक्तिमान विकास काळे यास पोलिसांनी अटक केली आहे.व पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा मुंडे या करीत आहेत.

Back to top button