स्था.गु.शा. पुणे ग्रामीण यांची दमदार कामगीरी सराईत मोटार सायकल चोराकडून ३०६०००/-रु किमतीच्या एकूण ११ मोटार सायकली जप्त करून एकूण ५ गुन्हे उकडकीस.
येणे प्रमाणे वरील ५ गुन्हे उघडकिस एकूण ११ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
स्था.गु.शा. पुणे ग्रामीण यांची दमदार कामगीरी सराईत मोटार सायकल चोराकडून ३०६०००/-रु किमतीच्या एकूण ११ मोटार सायकली जप्त करून एकूण ५ गुन्हे उकडकीस.
येणे प्रमाणे वरील ५ गुन्हे उघडकिस एकूण ११ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
बारामती वार्तापत्र
आज दिनांक २०/१२/२०२० रोजी मा. पोलिस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख सो व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १७/१२/२०२० रोजी केलेल्या कारवाईतील मुख्य आरोपींचा व इतर सुत्रधार यांचा शोध घेत असताना स्था.गु.शा. पुणे ग्रामीण च्या खेड-जुन्नर पथकाला सदर गुन्हयातील मुख्य आरोपी आशिश बेल्हेकर हा नारायणगाव एस. टी. स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या नुसार स्था.गु.शा. पुणे (ग्रा) टीम ने नारायणगाव एस.टी स्टॅन्ड येथे मुख्य आरोपीस सापळा रचून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) आशिष सुनील बेल्हेकर वय २८ वर्ष. रा. नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे* असे सांगितले असता त्यांची व त्यांचेकडे असणारे मो.सा. ची त्यांचेकडे चौकशी केली असता सदर मोटार सायकल हया त्याचा मित्र पवन दत्तात्रय शेजवळ वय ३३ रा.नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे ह्याच्या मदतीने नारायणगाव व जुन्नर परीसरातुन चोरुन आणलेल्या असल्याचे समजले सदर बाबत संबधीत पो.स्टे.कडे खात्री करता त्या बाबत गुन्हे दाखल असल्याचे समजले तरी सदर संशयित इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खाली नमुद चोरी केलेल्या व विक्री करण्या करीता जवळ बाळगलेल्या एकुण ११ मोटार सायकली किंमत अंदाजे ३०६०००/- रु. किंमतीच्या मोटार सायकली काढुन दिल्या त्या सर्व मोटार सायकली जप्ती पंचनाम्याने जप्त करुन, आरोपी व जप्त मुददेमाल रिपोर्टाने नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाही करीता दिलेल्या आहेत. सदर कार्यवाहीत खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत.
१) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 403/2020 भा.द.वि.क. 379
२) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 378/2020 भा.द.वि.क. 379
३) नारायणगाव पो.स्टे. गु.र.नं. 404/2020 भा.द.वि.क. 379
४) जुन्नर पो.स्टे. गु.र.नं. 308/2020 भा.द.वि.क. 454,457,380
५)घरगाव पो.स्टे. अहमदनगर गु. र.न 391/2020भा.द.वी. 389
येणे प्रमाणे वरील ५ गुन्हे उघडकिस एकूण ११ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या साथीदाराकडून यापूर्वी १३ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सो, उप.विभा.पो.अधिकारी. मंदार जवळे. सोा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे आदेशाने व सुचने नुसार स.पो.नि. एन. एस. गंधारे,पो.हवा. विक्रम तापकीर,पो .हवा. हनुमंत पासलकर,पो.ना. दिपक साबळे,पो.कॉं. संदिप वारे,पो.काँ. निलेश सुपेकर,पो.हवा,सचिन गायकवाड,पो.ना. राजु मोमीन,पो.कॉ. बाळासाहेब खडके,पो.काॅ. अक्षय जावळे,प्रसाद पिंगळे पोलीस मित्र याचे पथकाने केली