स्थानिक

सरसकट वीज बिल माफ करावे

रिपब्लिकन युवा मोर्चा च्या वतीने वीज कंपनीवर जन आक्रोश मोर्चा

सरसकट वीज बिल माफ करावे

रिपब्लिकन युवा मोर्चा च्या वतीने वीज कंपनीवर जन आक्रोश मोर्चा

 बारामती  वार्तापत्र
कोरोना राष्ट्रीय आपत्तीत देशातील सर्वोत्परी घटक याचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते. प्रामुख्याने लघुउद्योजक ,छोटे मोठे व्यावसायिक यांचे व्यावसाय डबघाईला आले तर असंख्य लोक रोजगारा पासून वंचित झाले.

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे ञिशंकु सरकार असून जनहितासाठी ते निर्णायक काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्तीत लोकांचे जगणे जिकरीचे झाले आहे. सरकारने मध्यम मार्ग म्हणून गेल्या काही महिण्यांपुर्वी पन्नास टक्के विजबिल माफी बाबत अहवाल तयार केला होता. परंतु राजकीय महाविकास आघाडीत तारतम्य नसल्यामुळे सदर सरसकट विजबिल माफी चा प्रस्ताव पुढे रेंगाळला .

बारामती तालुका शहर व ग्रामीण भागातील रिपब्लिकन युवा मोर्चा व बारामती मधील बहुजन संघटनांचे प्रतिनिधी यांचे संयुक्तपणे तसेच बारामती मधील ञस्त विजबिल धारक महिला ,पुरुषांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी, बारामती च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बारामतीतील सर्वसामान्यांची सरसकट विजबिले पुर्णपणे माफ करणे कामी जनआक्रोश मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बारामती मधील रिपब्लिकन युवा मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय लोंढे , पुर्व विभाग पुणे अध्यक्ष अनिल मोरे , बारामती तालुका उपाध्यक्ष आनंद काकडे , सामाजिक कार्यकर्ते संदिप बनसोडे , शेरसुहास मिञ मंडळ व मानव एकता युवक संघटना प्रमुख मा श्री भारत दादा अहिवळे , शुभम अहिवळे , मार्केट कमिटीचे विलास पोमणे , काँग्रेस शहर युवक अध्यक्ष योगेश महाडीक , आनंद माने , तसेच बारामती मधील बहुसंख्य विजबिल ञस्त ग्राहक उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणा बाजी करीत महामानवांच्या घोषणा करीत , विजबिल सरसकट माफ करा अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य विज वितरण चे सहायक अभियंता प्रकाश देवकाते व धनंजय गावडे यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्या समजून घेऊन सर्व मागण्या शासन दरबारी पोहचवन्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच कोरोना काळात आलेल्या विजबिलांची फेरतपासणी आढावा, चुकून लादलेली ज्यादा बिले यांचे सर्व्हेक्षण योग्य तपासणी मोहिम राबवून जनतेसाठी हितार्थ निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले. असल्याचे अजय लोंढे , पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ,रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पुणे . यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram