बारामती आज 11 रुग्ण पॉझिटिव्ह कोरोणाचा वेग मंदावतोय
बारामतीतील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5672
बारामती आज 11 रुग्ण पॉझिटिव्ह कोरोणाचा वेग मंदावतोय
बारामतीतील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5672
बारामती वार्तापत्र
बारामतीत काल पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यात आज चार रुग्णांची घट होऊन ही संख्या 11 वर आली आहे .त्यामुळे बारामतीत कोरोनाचा वेग मंदावत चाललेला दिसून येत आहे. नागरिकांनी अजूनही काळजी घ्यावी. म्हणजे कोरोणाचे उच्चाटन करण्यात शासकीय यंत्रणेला यश येईल.
आज शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या एकूण 53 rt-pcr नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 11 नमुन्यांपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला असून.एंटीजेन तपासणी मध्ये झालेल्या 24 नमुन्यांपैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात शहरातील 6 तर ग्रामीण भागातील 5 अशी अकरा रुग्णसंख्या पॉझिटिव्हआली आहे.
बारामतीतील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5672 व बरे झालेले रुग्ण 5321 ,, व एकूण मृत्यू 136 असे आहेत.
तुम्ही घरात बसा ,कोरोणाला हरवा सॅनिटायझर ,मास्क वापरा, अनावश्यक गर्दी टाळा