सहा वर्षाच्या ‘ चिमुरडीचा ‘ असाही एक विक्रम
सर्व स्तरातून कौतुक
बारामती वार्तापत्र
समाजात असेही काही लोक आहेत की ज्यांना अजून सायकलही चालवता येत नाही, पोहोता येत नाही. मात्र गोखळी तालुका फलटण येथील कु.स्वरा योगेश भागवत ,वय वर्ष 6 या मुलीने फक्त 1O तासात 143 किलोमीटर सायकल चालवून नवा विक्रम केला आहे. गोखळी सारख्या ग्रामीण भागातून या चिमुरडीने इतके मोठे धाडस केले त्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहेत. स्वराने खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती सायकल क्लबने आयोजित केलेल्या नीरा बारामती – बारामती नीरा या 80 किलोमीटर सायकल रॅलीत भाग घेत हा टप्पा सहज पार केला होता. तीच्या या सायकलिंग मुळे बारामतीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी तिचा सन्मान केला होता.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही स्वराला सन्मानित केले आहे.
वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल चालवुन आरोग्य सांभाळण्याचा सल्लाही आपल्या विक्रमातून स्वरा देत असते. तिला यापुढील कार्यात समस्त बारामतीकर नागरिकांच्या वतीने बारामती वार्तापत्र च्या शुभेच्छा.