
तुमच्या ग्रामपंचायतीचा सदस्य सातवी पास आहे का?
निवडणूक आयोगाचा अध्यादेश जारी
बारामती वार्तापत्र
राज्यात 14234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक आठवड्यात ग्रामपंचायत या विषयास संबंधित शासनाकडून काहीतरी नवीन नियमावली निघत आहे. त्यामुळे नक्की काय असा प्रश्न ग्रामीण भागातील लोक विचारत आहेत.
त्यातच आता निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे ,मतदार यादीत त्याचे नाव असावे ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवार हा सातवी पास असला पाहिजे. अशी अट टाकली आहे.
त्यामुळे काही जुनेजाणते परंतु न शिकलेल्या उमेदवारांची या नियमामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयाचे सुजान व सुशिक्षित मतदारांनी स्वागतच केले आहे .आपल्या गावचा कारभार पाहणारा सदस्य किंवा सरपंच त्याच्यावरच संपूर्ण गावाची विकासाची मदार असते. त्यामुळे सुशिक्षित असल्यास गाव पुढे जाण्यासाठी लोकांना सार्वजनिक सेवा-सुविधा मिळण्यासाठी नक्कीच हा नियम उपयोगी ठरेल मात्र या नियमामुळे जे 7 वी पास नाहीत त्यांची मात्र अडचण होणार हे नक्की.