उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद महामंडळाकडून कर्ज मंजूर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप
25 विद्यार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव महामंडळाकडे पाठवून ते मंजूर करण्यात आले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद महामंडळाकडून कर्ज मंजूर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप
25 विद्यार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव महामंडळाकडे पाठवून ते मंजूर करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
उच्चशिक्षण घेणाऱ्या बारामती तालुक्यातील व परिसरातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ ,मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेचा बारामती नगरपरिषद उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद व मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये बारामती तालुक्यातील व परिसरात उच्च शिक्षण घेणाऱ्या 25 विद्यार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव महामंडळाकडे पाठवून ते मंजूर करण्यात आले. त्या मंजुरी पत्रांचे वाटप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अल्ताफ सय्यद यांनी महामंडळाच्या पुणे व मुंबई येथील कार्यालयात सतत पाठपुरावा करून अजितदादांच्या माध्यमातून हे प्रस्ताव मंजूर करून आणले.या कर्ज मंजुरी मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी चे खर्चाची तरतूद करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. यापुढील काळातही अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, नवबौद्ध, शीख व पारशी समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.