भीमा नदी पात्रात सापडली शंकराची मूर्ती
मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
बारामती वार्तापत्र
दौंड येथील भीमा नदीच्या पात्रात सुमारे एक टन वजनाची शंकराची पुरातन मूर्ती सापडली आहे. शनिवारी याठिकाणी खोदकाम सुरू असताना ही मूर्ती सापडली
भीमा नदी वरून दौंड नगर ही रेल्वे लाईन जात असून या नदीवर रेल्वेचा मोठा पूल आहे या पुला शेजारी आणखी एका पुलाचे कामासाठी खोदकाम सुरू आहे .या खोदकामात जेसीबीच्या साह्याने खड्डा काढला जात होता. त्यावेळी ही मूर्ती सापडली असून मूर्ती चे वजन साधारण एक टन आहे.
संपूर्ण दगडातील ही मूर्ती आहे ही मूर्ती सापडल्यामुळे याठिकाणी अती प्राचीन असे काही मंदिर किंवा अन्य काही अवशेष आहेत की काय याविषयी खोदकाम करण्याची गरज आहे. पुरातन विभागाने याठिकाणी तपासणी करून त्याविषयीचा सर्वे करावा ही मूर्ती सापडल्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिक मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.